तुळजापूर : कुमार नाईकवाडी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 64 व्या महापरिवर्तन महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवार दि. ६ डिसेंबर रोजी विनम्र अभिवादन करण्यासाठी सर्व समाजातील सर्व सामाजिक धार्मिक संघटनातील व सर्व राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन रविवारी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर 1064 दीप प्रज्वलित करून अनोखी अशी मानवंदना देण्यात आली.
यावेळी नगरीचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी, मराठा आरक्षण समिती राज्य समन्वयक सज्जनराव साळुंखे, जिवनराजे इंगळे, धैर्यशील कापसे, तसेच राष्ट्रवादीचे महेश चोपदार, काँग्रेसचे उमेश पैलवान, भाजपाचे गुलचंद व्यवहारे, आनंद कंदले, प्रसाद पानपूडे, वंचित आघाडीचे नेते मिलींद रोकडे, रिपाईचे नेते तानाजी कदम, नगरसेवक औंदूबर कदम तसेच सुभाष मारूती कदम,दाजीबा कदम, राजाभाऊ सातपूते, अमोल कदम, यांनी या कार्यक्रमास उपस्थीत राहून अभिवादन करून कार्यक्रमास चे कौतूक केले. बाबासाहेबांचे कार्य कुण्या एका जाती धर्मासाठी नसून सर्व भारतीयांचा उद्धार करण्यासाठी आहे विशेषतः महिलांचा सन्मान करण्यासाठी आहे व तळागाळातील व समाजातील आदिवासी वंचित लोकांना न्याय देण्यासाठी आहे हे प्रकर्षाने जाणीव करून देण्यासाठी सर्व समाजातर्फे वेगळ्या पद्धतीने महामानवाला अभिवादन करण्यात आले.
आयोजक सागर कदम, जिवन कदम, लक्ष्मण कदम, कमलेश कदम शुभम कदम, कुणाल रोंगे, अनमोल शिंदे. इत्यादी तरुणांनी एकत्र येऊन सर्व तुळजापूर शहरवासीयांना विनंती करून हा आगळावेगळा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे माजी सरचिटणीस आयुष्मान दत्ता सुखदेव माने यांनी तर आभार प्रदर्शन आयुष्मान जीवन कदम यांनी केले.