चिवरी : राजगुरु साखरे 

तुळजापूर तालुक्यात सध्या ऊस तोडणीसाठी आधुनिक पद्धत वापरण्याचा प्रघात सुरू असून हार्वेस्ट यंत्रांनी उफस तोडणी होत आहे. यामुळे वेळ व पैशाची बचत होत असल्याने शेतकऱ्यांसाठी हार्वेस्टर फायदेशीर ठरत आहे. 

हार्वेस्टर मशीन ऊस मुळापासून तोडला जातो. त्यामुळे एकरी उत्पादन वाढते. त्याचबरोबर शेतकऱ्याचे पिकांची नुकसान होत नाही. तोडलेला ऊस कमी वेळेत कारखान्याच्या काट्यावर पोहोचल्याने तो वाढत नाही. त्यामुळे वजन वाढते. ऊस थेट कारखान्याच्या गव्हाणीत पोहोचतो. या यंत्रामुळे ऊस तोडणी मजुरांच्या मागे धावण्याची गरज नाही. एकंदरीत या ऊस तोडणी यंत्रामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. स्वतःचा ऊस लवकर तोडला जावा, यासाठी प्रत्येकजण प्रयत्नात असल्याचे चित्र सध्या या परिसरात दिसत आहे.

 
Top