नळदुर्ग, दि. 08 : गेल्या सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारने केलेले तीन कृषीविषयक कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी देशभरातील शेतकरी संघटनांनी आज मंगळवारी भारत बंद पुकारला आहे. या बंदला ऐतिहासिक नळदुर्ग शहरात महाविकास आघाडीच्यावतीने आवाहन केल्याने व्यापा-यानी दुकाने बंद ठेवून उत्स्फुर्तपणे पाठिंबा दिला.
येथील बसस्थानकासमोर सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन केंद्र शासनाचा जाहीर निषेध केला. यावेळी अनेकांनी आपल्या संतप्त भावना मनोगतातून व्यक्त केल्या.
यावेळी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, शहरप्रमुख संतोष पुदाले, काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज काझी, नगरसेवक बसवराज धरणे, शहबाज काझी, विनायक अहंकारी, शरीफ शेख, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेबुब शेख, नगरसेवक मुश्ताक कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते सुनिल बनसोडे, अजहर जहागिरदार, सुनिल गव्हाणे, शाम कनकधर, नाना काझी, बशीर शेख यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, व्यापारी उपस्थित होते.