रेडा, दि. 08 : कमी खर्चात जास्त उत्पादन वाढीसाठी जमीनीचे आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन बावडा कृषी मंडल अधिकारी सुर्यवंशी यांनी केले. 

मौजे रेडा (ता इंदापुर) येथे " जागतिक मृदादिन " निमित्त कृषी विषयक एक दिवसीय कार्यशाळा व कृषी चर्चा सञ कार्यक्रमात मंडल कृषी आधिकारी सुर्यवंशी बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की दिवसेन दिवस शेतातील जमीनीची सुपिकता बदल आहे तसेच नैसर्गिक आपत्ती मधे तिव्र दुष्काळ, व अतिवृष्टी आणी हवामानातील बदल यामुळे शेतातल पिकाला अवशक घटक मिळत नाही. त्यामुळे शेतकरी यांनी आप-आपल्या शेतातील जमीनीच्या मातीचे परिक्षण करून घेणे गरजेचे आहे. 

यावेळी कृषी पर्यवेक्षक मिसाळ यांनीही जैविक गीताचा वापर करण्यास सांगितले व बैंक ऑफ महाराष्ट्र भिगवण शाखेचे फलफले,  तर रेडा गावच्या कृषी सहाय्यक क्षीरसागर बोराटे, कृषी सहाय्यक गुरव,भुजबळ यांनी कृषी विभागाच्या विविध योजना व बैंक अर्थ साह्य बाबत माहिती दिली. 

 या कार्यक्रमात रेडा गावचे पोलिस पाटील ज्योती भोसले, निरा भीमा साखर कारखाना संचालक बबन देवकर, इंदापुर बाजार समिती संचालक सचिन देवकर, सह रेडा, काटी परिसरातील शेतकरी यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

 
Top