जळकोट, दि. २६ : मेघराज किलजे

दि. २५  रोजी गोरसीकवाडी संघटनेची वार्षिक आढावा बैठक संघटनेचे राष्ट्रीय मुखीया काशिनाथ नायक यांच्या अध्यक्षतेखाली तर राष्ट्रीय हसाबी आर.सी. चव्हाण,गोरसेनेचे राष्ष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. 

यावेळी पूर्ण वर्षाचे संघटनेने केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच पुढील कामाचे नियोजन करण्यात आले. या बैठकीत नुतन पदाधिकारी निवड करुन  कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य गोरसीकवाडी संघटनेचे संयोजक (नायक) म्हणून  देविदास राठोड( जळकोट) यांची तर सहसंयोजक (कारभारी) म्हणून  प्रा.अनिल राठोड (वाशिम) यांची नियुक्ती करण्यात आली. भारत देशाचे गोर विद्यार्थी दळ व रायसिना स्टडी सेंटर प्रमुखपदी प्रा.प्रविण राठोड (औरंगाबाद ) यांची तर  गोरसेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा.संपत चव्हाण (माजलगाव) , गोरगावळीया महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी श्री. यशवंत पवार  (वासिम) व  महाराष्ट्र राज्य गोरगावळीया सचिवपदी साहेबराव महाराज (पायटंगीकर ), लातुर विभागीय गोरसीकवाडी संयोजकपदी   देविदास राठोड   (कळळमनुरी ) तर लातुर विभागीय गोरसीकवाडी सहसंयोजक म्हणून  प्रकाश पवार (नांदेड )  यांची निवड करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य विविध दळ पदाधिकारी, विभागीय संयोजक - सहसंयोजक, जिल्हा जिल्हयाचे संयोजक - सहसंयोजक, अध्यक्ष - उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.

या वेळी  नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संयोजकपदी निवड झालेले देविदास राठोड हे मूळचे जळकोट येथील रहिवासी असून, ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लोहगाव येथील मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. संघटनेच्या माध्यमातून अनेक कामे त्यांनी केली आहेत. संघटनेने संयोजक म्हणून त्याची निवड केली आहे. या निवडीबद्दल बंजारा समाज व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


 
Top