तुळजापूर, दि. 26 : डॉ. सतीश महामुनी

तुळजापूर हे तीर्थक्षेत्र असून केवळ गर्दीच्या काळात एकेरी वाहतूक अधिक असली तरी इतर दिवशी येथील वाहतूक असता कामा नये, अशा प्रकारच्या वाहतूक पद्धतीमुळे व्यापार अडचणीत आला आहे, अशी तक्रार घेऊन तुळजापूर येथील व्यापाऱ्यांनी बस स्थानक परिसरातील व्यापाऱ्यांनी वाहतूक बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. तुळजापूरच्या नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी व्यापाऱ्यांची ही मागणी रास्त असून वाहन तळ असल्याचा गैरफायदा पोलीस प्रशासनाकडून घेण्यात येत असून सक्तीची पोलिसांची वसुली चुकीची आहे असा आरोप केला आहे.

तुळजापूर बस स्थानक परिसरात अनावश्‍यक असलेली एकेरी वाहतूक बंद करण्यात यावी, अशी मागणी तुळजापूरचे नगराध्यक्ष आणि समस्त व्यापाऱ्याच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन तुळजाभवानी मंदिर संस्थांनला देण्यात आले.

तुळजापूर शहरात एकेरी वाहतूक केल्यामुळे व्यवसाय धोक्यात आले आहेत. यापूर्वी गेल्या सात-आठ महिन्यांपासून कोरोना संसर्गाच्या आपत्तीच्या काळात व्यापारी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यानंतर पुन्हा प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे व्यापाऱ्याला आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. गेल्या अनेक दिवसापासून व्यापाऱ्यांची एकेरी वाहतूक रद्द करण्याची मागणी असून आज या मागणीचे निवेदन तुळजापूरचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी आणि छावाचे नेते महेश गवळी, बचत गटाचे अध्यक्ष अजित अमृतराव, किशोर रोचकरी आणि इतर व्यापाऱ्यांनी दिले. याप्रसंगी तहसीलदार सौदागर तांदळे उपस्थित होते.

श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणारे लोक चारचाकी वाहने घेऊन येतात. तसेच शहरातील व दुचाकी वाहने तुळजाभवानी मंदिर परिसर आणि भवानी रोड बस स्थानक परिसरात लावतात. नगरपरिषदेने वाहनतळाची व्यवस्था न केल्यामुळे सदर वाहने रस्त्यावर उभी केली जातात. याचा फायदा घेऊन पोलिस प्रशासनाच्या वतीने वाहतुकीला अडथळा होत असल्याचे कारण दाखवून तसेच शासकीय नियमांना पुढे करून वाहनधारकांना दंड करण्याचे सूत्र गेल्या अनेक दिवसापासून चालवले आहे. यामुळे बाहेरून येणारा भाविक भक्तांना त्रास होतो.

ज्या तीर्थक्षेत्रांमध्ये वाहन तळ असेल तेथे दंड काढा करावा अशा प्रकारची प्रतिक्रिया भाविकाकडून येत होत्या.  त्याचबरोबर शहरातील रस्ते तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणाकडून मोठे करण्यात आले आहेत. मात्र रस्त्यावर व्यवसाय करणारे व्यापारी आणि वाहने उभे करून वाहतुकीला अडथळा आणला जातो. जबाबदार नागरिक देखील अशा प्रकारच्या चुका करून पोलिसांना दंड करण्यासाठी प्रवृत्त करतात. अशा प्रकारची परिस्थिती तुळजापुरातील रस्त्यावर आहे. गैर शिस्तीचा फायदा प्रशासनाला होत असून प्रशासन त्यांच्या नियमाप्रमाणे दंडवसुलीच्या सत्र चालू होत आहे. 

या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी ठेवली पाहिजेत म्हणजे रस्त्यावर गर्दी होणार नाही आणि शहरवासियांची वाहने रस्त्यावर उभी असल्याचे पाहून बाहेरगावचे मंडळीदेखील रस्त्यावर वाहने उभी करणार नाही. ही सर्व परिस्थिती सर्वांनी आपली जबाबदारी नीट पार पाडतात. तुळजापूर शहरातील वाहतूक शिस्तीत होण्यासाठी प्रत्येक वाहनधारकाने सहकार्य करण्याची गरज आहे असे मत देखील यानिमित्ताने जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. वाहनतळाची सोय नसल्यामुळे दंड वसुली करू नये, अशा प्रकारचा मतप्रवाह तुळजापुरात आहे. पोलिसांनी दंड वसुली तात्काळ बंद केली पाहिजे, अशी मागणी होत आहे.

 
Top