तुळजापूर : कुमार नाईकवाडी 

गेल्या सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारने केलेले तीन कृषीविषयक कायदे मागे पारित केले. सदरील कृषीविषयक कायदे घेण्याच्या मागणीसाठी "जय जवान जय किसान" असा नारा देत" मोदी सरकारचा निषेध करीत दिल्ली येथे पंजाब, हरियाणा शेतकरी वर्गाच्या वतीने सिमेवर मोदी सरकारच्या विरोधात गेल्या १५ दिवसा पासुन  होत आंदोलन सुरु आहे. तसेच आज मंगळवारी बंद पुकारण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर तुळजापुर येथील महाविकास आघाडी वतीने दिल्ली येथे होत असलेल्या आंदोलनास पाठींबा देत तुळजापुर शहरातुन मोर्चा काढून मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तसेच येथील जुने बसस्थानका समोरील विश्वनाथ कॉर्नर या ठिकाणी रास्ता रोको करुन मोदी सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने घोषणा बाजी करण्यात आले. मोदी सरकारने भारतीय शेतकऱ्यांवर केलेला कायदा त्वरीत रद्द करण्यात यावा, मोदी सरकारच्या विरोधात घोषणा बाजी करुन महाविकास आघाडीच्याच्या वतीने तहसीलदार सौदागर तांदळे यांना आंदोलनस्थळी मागण्याचे निवेदन देण्यात आले.

या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीचे तुळजापुर तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, विधानसभा अध्यक्ष गोकुळ शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमर मगर, काँग्रेस नगरसेवक रणजीत इंगळे, सुनिल रोचकरी, आनंद जगताप, अभिषेक कोरे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सज्जनराव सांळुके, धैर्यशील कापसे, शिवसेनेचे नेते श्याम पवार, सुधीर कदम, प्रतिक रोचकरी, सागर इंगळे, चेतन बंडगर, शंकर लोभे, रा.काँ.चे युवक जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम,  रा.काँ. युवक चे तालुकाध्यक्ष संदीप गंगणे, रा.काँ.शहर युवक अध्यक्ष शरद जगदाळे, आप्पासाहेब पवार, बबन गावडे, प्रविण घुगे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे, वंचित बहुजन आघाडीचे मिलींद रोकडे, काँग्रेसचे अनंत कोंडो, लखन पेंदे, अमोल कुतवळ, करण सांळुके आदीसह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, स्वाभीमानी शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होते.


 
Top