नळदुर्ग, दि. 07 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दि. 7 डिसेंबर रोजी नळदुर्ग येथील डॉ .आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल येथे विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली.
विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रोत्साहन म्हणून वाचनात गोडी निर्माण व्हावी या हेतूने आज सोमवार रोजी मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्या वाढदिवसानिमित्त नळदुर्ग येथील डॉ .आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल येथे विद्यार्थ्यांना जिल्हा सचिव ज्योतीबा येडगे, शहराध्यक्ष अलिम शेख, शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी यांच्या हस्ते पुस्तके वाटप करण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे, मनविसे शहराध्यक्ष सुरज चव्हाण, शहर सचिव भाऊराज कांबळे, संदीप वैद्य, अमीर फुलारी यांच्यासह कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक जायभाये यांनी केले तर आभार मनसेचे प्रमोद कुलकर्णी यांनी मानले.