अचलेर : जय गायकवाड
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लोहारा तालुक्यातील अचलेर येथे गीत सुमनांजली कार्यक्रम घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन सर्व माता-भगिनिंच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सदानंद कांबळे यांच्या समवेत उपस्थित सर्वांनी समुदायीक त्रीसरण पंचशिल ग्रहण केले.
तदनंतर शालेय विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या भाषण स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना अनिल श्रीरंग माने यांच्या वतीने शालेय साहित्य बक्षीस स्वरूपात देण्यात आले.
सोबतच सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात दहावी बोर्ड परीक्षेत भीमनगर येथून सर्वाधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या अनुक्रमे प्रथम व द्वितीय विद्यार्थ्यांना बुद्ध.कस्तुराबाई सिद्राम बनसोडे यांच्या स्मरणार्थ आयु.सुमित बनसोडे सर यांच्या तर्फे बक्षीस देण्यात आले.
या महापरिनिर्वाण दिनानिमित्त न्यू.अशोका गायन पार्टी (कलदेव निंबाळा),राहुल गायन पार्टी (डाळिंब)यांचा गीत सूमनांजली कार्यक्रम घेण्यात आला.अतिशय शांततेत हा शोक श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश लोखंडे (सरपंच),सूत्रसंचलन कांचन सुरवसे तर आभार सौरभ मोरे यांनी मानले.
यावेळी भीमनगर मधील सर्व बौद्ध उपासक,उपसिका,लहान, थोर,उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी धम्मदिप तरुण मंडळाच्या तरुणांनी परिश्रम घेतले.