नळदुर्ग, दि. 06 :  येथील सर्वे नं.२३६/१ मध्ये श्री दत्त मंदिर बांधण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. सर्वे नं २३६ मध्ये तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे मल्हार नगर मधील नागरीकांनी श्री दत्त मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

 याठिकाणी अतीशय सुरेख अशी श्री गुरुदेव दत्तांची मुर्ती प्रकट झाली आहे. या जागेतच श्री दत्त मंदिर बांधण्याचा निर्णय येथील नागरीकांनी घेतला आहे. सुरुवातीला याठिकाणी एक कट्टा बांधुन त्या कट्ट्यावर श्री दत्त मुर्तीचे विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. 

दि.६ डिसेंबर रोजी श्री दत्त मंदिर बांधण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. सेवानिवृत्त शिक्षक शिवाजीराव मिटकर, रुपचंद जाधव,शशिकांत घोडके व नारायण घोडके यांच्या हस्ते प्रारंभी श्री दत्त मुर्तीचे पुजन करण्यात आले त्यानंतर टिकाव मारून मंदिर बांधण्याच्या कामाचे भुमीपूजन करण्यात आले. नळदुर्ग शहरात दत्त मंदिर नव्हते आता याठिकाणी श्री दत्त मंदिर उभारण्यात येत असल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.

या कार्यक्रमास राजेंद्र मोटे, रमेश सुरवसे, रामेश्वर घोडके, शिवाजी घोडके, वामन घोडके, गुलाब शिंदे, आनंद पवार, राहुल घोडके, श्रीराम जाधव, नितीन घोडके, पत्रकार विलास येडगे, शिवसेनेचे ज्ञानेश्वर घोडके, सामाजिक कार्यकर्ते अमर भाळे यांच्यासह नागरीक उपस्थित होते.

 
Top