नळदुर्ग : एस.के. गायकवाड
दि. ६ डिसेंबर रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त नळदुर्ग व परिसरात त्यांना अभिवादन करण्यात आले.
नळदुर्ग येथील इंदिरा नगरच्या सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बी.आर. ग्रुपच्या वतीने आभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सपोनि कैलास लहाने व पत्रकार विलास येडगे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना आभिवादन करण्यात आले. या प्रसंगी सपोनि कैलास लहाने, प्रा.डॉ. पी.एस. गायकवाड, रिपाइंचे युवा जिल्हा कार्याध्यक्ष अरुण लोखंडे, महिला कार्यकर्त्या कल्पना गायकवाड आदींची अभिवादनपर भाषणे झाली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस.के. गायकवाड यांनी केले. तर आभार प्रदर्शन बी.आर.ग्रुपचे संस्थापक मारुती खारवे यांनी केले. यावेळी पत्रकार उत्तम बनजगोळे, अमर भाळे, अरविंद लोखंडे, दलित कांबळे, बाबु गायकवाड, चंद्रकांत बनसोडे, अमित गायकवाड सह कार्यकर्ते महिला उपस्थिती होते.
येथील बसस्थानक परिसरात अफसरा कॅफे हॉटेलच्या समोर रिपाइंच्या वतीने अभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. प्रारंभी जेष्ठ कार्यकर्ते मैनोदिन इनामदार, बाशिदभाई कुरेशी, प्रा.डॉ. सुभाष राठोड, नगर सेवक दयानंद बनसोडे आदींच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष भैरवनाथ कानडे यांचे अभिवादनपर भाषण झाले.
यावेळी सत्तार कुरेशी, रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष दुर्वास बनसोडे, तालुका अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, नळदुर्ग शहराध्यक्ष दत्ता बनसोडे, रिपाइंचे जिल्हा सचिव एस.के. गायकवाड, बहुजन वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष मारुती बनसोडे, रिपाइंचे युवा आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष अरुण लोखंडे, मारुती खारवे, सुरेश लोंढे, धनु राठोड, शिवाजी राठोड, प्रकाश बनसोडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक कैलास गवळी, देवानंद लोंढे, अंकुश लोखंडे, शिवाजी महाबोले सह कार्यकर्ते उपस्थित होते.
येथून जवळच अंतरावर असलेल्या वागदरी ता. तुळजापूर येथील भिमनगर मधील समाज मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने अभिवादनच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार, माजी सरपंच नागनाथ बनसोडे, ग्रा.प.सदस्य रावसाहेब वाघमारे, महादेव बिराजदार, मुक्ताबाई वाघमारे, बकुलाबाई भोसले, कमलबाई धुमाळ, महादेव वाघमारे, अनिल वाघमारे, एस.के.गायकवाड, सहादेव वाघमारे, रमेश जेटीथोर, चंद्रकांत वाघमारे, श्रीरंग बनसोडे, गुनाबाई बनसोडे, दाजी मोहन वाघमारे, वाल्मिक वाघमारे सह कार्यकर्ते महिला उपस्थित होते.
वागदरी येथील ग्रा.प. कार्यालयात व जि.प.प्राथमिक शाळेत ही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.