अचलेर : जय गायकवाड 

महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती परिषद यांच्याकडून दिला जाणारा व्यसनमुक्ती क्षेत्रातील राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कारासाठी श्री नागनाथ  भडकुंबे यांची निवड झाली आहे.

 सोलापूर जिल्ह्यातील गुंजेगावच्या नागनाथ भडकुंबे यांनी व्यसनमुक्ती कार्याची सुरुवातयेरमाळा येथील येडाई व्यसनमुक्ती केंद्रात केली व केंद्राच्या माध्यमातून सोलापूर ,उस्मानाबाद,व मराठवाडा भागातील व्यसनाने त्रस्त युवकांना व्यसन मुक्ती साठी प्रेरित केले व्यसनमुक्ती कार्य शी संबंधित पोस्टर प्रेझेंटेशन देखील राष्ट्रीय व्यसन मुक्ती परिषदेत नवी दिल्ली येथे केले आहे. सध्या ते जिल्हा रुग्णालय बीड येथे कार्यरत आहेत या पुरस्काराचे वितरण उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा येथील येडाई व्यसनमुक्ती केंद्र येथे दि. ३१ डिसेंबर २०२० करण्यात येणार आहे.

 
Top