उस्मानाबाद, दि. 08 : सातवी आर्थिक गणना जिल्हास्तरीय समन्वय समितीची दि.8 डिसेंबर 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे बैठक संपन्न झाली.यावेळी कॅामन सर्विस सेंटर (CSC)चे जिल्हा व्यवस्थापक यांना सातव्या आर्थिक गणनेचे क्षेत्रीय काम अधिक गुणवत्तापूर्ण अणि अचूक करण्यावर भर देण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सुचित केले.आर्थिक गणनेच्या कामात काही अडचणी आल्यास प्रशासनामार्फत सर्वोतोपरी सहकार्य करण्याबाबत सूचना केल्या. जिल्हास्तरीय समन्वय समितीकडून आर्थिक गणनेच्या कामाचा आढावा घेवून सदर काम 31 डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल, या कामात दिरंगाई होणार नाही व विसंगती राहणार नाही. याची सर्व संबंधितांनी दक्षता घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री.कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले.
यावेळी जिल्हयातील सर्व नगरपालिकेचे मुख्याधिकारी, पोलीस अधिक्षक यांचे प्रतिनीधी व जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला, राष्ट्रीय नमूना पाहणी कार्यालयाचे संदिपान सरकार, विभागप्रमुख (अर्थशास्र) तेरणा महाविद्यालय चे श्री. मोरे,जिल्हा सांख्यिकी अधिकारी वामन जाधव इ.समन्वय समिती सदस्य उपस्थित होते.
जिल्हयातील सर्व शहर व गावात गणनेचे काम प्रभावीपणे होण्यासाठी जिल्हाधिकारी श्री.कौस्तुभ दिवेगावकर यांनी स्थानिक प्रशासन व पंचायत आणि सर्व नागरिकांना प्रतिसाद देउन सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.