उस्मानाबाद, दि. 07 : रहदारीस अडथळा व धोका होईल, अपघाताची शक्यता निर्माण होईल अशा रितीने रस्त्यावर वाहन उभे करणाऱ्या व्यक्तींविरुध्द दि. 06.12.2020 रोजी भा.दं.सं. कलम- 283 अन्वये 5 गुन्हे उस्मानाबाद पोलीसांनी नोंदवले. यात सुभाष ढवारे व सत्तार मुलानी या दोघांनी ढोकी बसस्थानकासमोर रस्त्याच्या मध्यभागी रिक्षा उभा केल्याबद्दल ढोकी पो.ठा. येथे 2 स्वतंत्र गुन्हे नोंदवले.
तर डॉ. आंबेडकर चौक, परंडा येथे रस्त्यावर मोटारसायकल उभी करणाऱ्या लक्ष्मण भोजणे व छ. शिवाजी महाराज चौकात टाटा मॅजीक वाहन उभे करणारे कुलदीप काटकर यांच्याविरुध्द 2 स्वतंत्र गुन्हे परंडा पो.ठा. येथे नोंदवण्यात आले. तर नळदुर्ग बसस्थानकासमोरील रस्त्यावर मोटारसायकल उभी करणाऱ्या राजूसिंग कच्छवा यांच्याविरुध्द नळदुर्ग पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.