उमरगा, दि. 07 : रयत क्रांती संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रयत क्रांती चषकाचे आज सोमवारी ॲड. शितल शामराव चव्हाण व नगरसेवक प्रा. पंढरीनाथ कोने यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.
रयत क्रांती मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित रयत क्रांती चंषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम फेरीच्या सामन्यात शिवक्तती संघाने यमराज संघावर विजय मिळवत रयत क्रांती चंषक पटकावले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ ॲड. शितल चव्हाण व नगरसेवक पंढरीनाथ कोणे सर यांच्या हस्ते झाले. यावेळी ॲड. शितल चव्हाण, नगरसेवक पंढरीनाथ कोणे, ॲड. अक्षय तोतला, ॲड. मनोहर गायकवाड, ॲड. नितीन माळी, करीम शेख, प्रा. अतुल गायकवाड (औरादे), प्रा. युसुफ मुल्ला आदीजण उपस्थित होते.
अंतिम सामन्याचा सामनावीर पुरस्कार अतुल पोतदार याला मिळाले. तर विजयी संघास पाच हजार रुपये रोख तर उपविजेता संघास 2100 रुपये रोख व रयत क्रांती चंषक देण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुरज आबाचने, विक्रम वाघमारे, ओमकार सौंदगे, इम्रान लाडगे आदीनी पुढाकार घेतला.
स्पर्धेतील वैयक्तिक बक्षिसे तर मध्ये विजेता संघाचे कर्णधार आकाश गायकवाड तर उपविजेता संघाचे कर्णधार प्रशात कडले, उत्कृष्ट फलंदाज व मालिकावीर अतुल पोतदार, उत्कृष्ट गोलंदाज रविकांत केदारे, उत्कृष्ट यष्टीरक्षक प्रमोद गिरी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अशोक मंमाळे आदींना पारितोषिके देण्यात आली.