ताज्या घडामोडी

 


जळकोट : मेघराज किलजे 

औरंगाबाद पदवीधर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार सतिश चव्हाण व राज्यातील महाविकास आघाडीचे इतर उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल जळकोट येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारांचे आभार मानून फटाक्यांची आतिषबाजी करून पेढे वाटून जल्लोष  साजरा करण्यात आला.

जळकोट येथील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सतीश चव्हाण यांनी सतत तिसऱ्यांदा विजयी पताका  फडकवल्याबद्दल व महाराष्ट्रातील इतर विधानपरिषदेच्या जागेवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी घवघवीत यश संपादन केल्याबद्दल काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.  

यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, तुळजाभवानी कारखान्याचे संचालक अशोक पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष महेश कदम, शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णात मोरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यशवंत पाटील,  प्रा.डॉ.अंकुश कदम , पंडित कदम, विजय मोरे, प्रा. राम कदम ,अप्पु स्वामी , विविध कार्यक्रारी सोसायटीचे चेअरमन राजु पाटील,  बसवराज कवठे , शंकर वाडीकर ,जितू पाटील, एकनाथ कदम, बालाजी माळी,अप्पू किलजे , विजय यादगौडा, बसवराज मडोळे, गुड, श्रीनिवास पाटील, उमेश गंगणे, अनिरुद्ध कदम ,अनिकेत कदम सौरभ कदम, ओंकार कदम ,प्रा. संतोष कदम, भिमाशंकर नरुणे , पिंटू चुंगे, पिंटू सुरवसे, विश्र्वास भोंगे झुंबर सुरवसे यांच्यासह मतदार ,ग्रामस्थ, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top