तामलवाडी : सर्जेराव गायकवाड

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतिश चव्हाण यांनी भाजपाचे शिरीष बोराळकर यांचा पराभव करून दणदणीत विजय मिळवला.या विजयाचा तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे पेढे वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला. 

मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे औरंगाबाद विभागाचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदवीधर उमेदवार आ. सतिश चव्हाण यांनी भाजपाचे उमेदवार शिरिष बोराळकर यांचा तब्बल ५७८९२ मतांनी पराभव करून दणदणीत विजय संपादन करून विजयाची हॅटट्रिक मिळविली. आ. सतिश चव्हाण यांनी दणदणीत विजय मिळवल्याने तामलवाडी येथील महाविकास आघाडीच्या नेते, कार्यकर्ते यांनी दिली. ४ रोजी सायंकाळी ७ वाजता पेढे वाटप करून, फटाक्यांची आतषबाजी करत चव्हाण यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी मुकुंद गायकवाड,बसवणप्पा मसुते,ज्ञानेश्वर जगताप यांनी मतदारांचे  आभार मानले. 

यावेळी राष्ट्रवादीचे अशोक भोसले, बसवण्णा मसुते,शिवाजी सावंत, उमेश गायकवाड,राजु सगर, शिवसेना गणप्रमुख दत्तात्रय गवळी, मुकुंद गायकवाड, पांडुरंग लोंढे, अमोल घोटकर, काँग्रेसचे माजी पं.समिती सदस्य गुंडप्पा गायकवाड, अजिज पटेल, रविकांत गुरव, शाहीर गायकवाड, अप्पा रणसुरे, सुधीर पाटील, ज्ञानेश्वर जगताप, अमोल माळी यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top