नळदुर्ग, दि. 21 : चंपाषष्‍ठी दिनी म्हणजे रविवार दि. 20 डिसेंबर रोजी मैलारपुर (नळदुर्ग) येथील श्री खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली हेाती. दिवसभरात सात ते आठ हजार भाविकांनी दर्शन घेतले.

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री खंडोबाचे मैलारपुर (नळदुर्ग) येथील मंदिरात पावणेदोन महिन्यांच्या वास्तव्यासाठी बुधवारी आगमन झाले आहे. त्यानंतर दि. 20 डिसेंबर रोजी श्रींच्या सात खेट्यांपैकी पहिला खेटा संपन्न झाला. तत्पूर्वी पहाटे ४ वाजता काकडा आरती, सकाळी महाभिषेक पुजा करण्यात आली. यादिवशी चंपाषष्ठी असल्याने श्री खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. पहाटेपासूनच भाविक श्री खंडोबा दर्शनासाठी मैलारपुरात दाखल झाले होते.

 
Top