तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र आली असली तरी जागावाटपावरून आघाडीत बिघाड होण्याची चिन्हे दिसत असुन भाजपातही जागा वाटपावरून नाराजीचा सुर उमटत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्यानंतर गावावात हळूहळू राजकारणाचा आखाडा तापायला सुरुवात झाली आहे.तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथील ग्रामपंचायतीचा आखाडा तापत असुन मागील काही दिवसात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी एकत्र करून ग्रामपंचायत निवडणूक लढवणार असे ठरले. परंतु जागावाटपावरून सध्या कलह निर्माण झाला आहे.त्यामुळे ही महाविकास आघाडी बिघडण्याची चिन्हे दिसून येत आहेत.या निवडणुकीत सुरूवातीला शांत असलेली भाजपा आपल्या उमेदवारांची चाचपणी करत असुन जागावाटपावरून भापामध्येही नाराजीचा सुर दिसून येत आहे.
नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.महाविकास आघाडी व भाजपामधुन अनेक दिग्गज नावांची चर्चा होत असुन आपल्या प्रभागामध्ये कोणता उमेदवार येणार याची मात्र थोडे दिवस नागरीकांना प्रतिक्षा करावी लागणार आहे.एकंदरीत जागावाटपावरून महाविकास आघाडी बिघडणार की एकत्र निवडणूक लढवणार? भाजपामध्येही जागावाटपावरून निघत असलेला नाराजीचा सुर दुर होणार का? यामधुन बंडखोरी होऊन अपक्षांचा तीसराच गट निर्माण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले असुन आठवडाभरात याचे उत्तर मिळणार आहे.