तुळजापूर, दि. २० : लहुजी शक्ती सेना तुळजापूर तालुक्यातील सर्वच्या सर्व ५३ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या जागा लढवत असून (दि.२०)रोजी कसई ता.तुळजापूर येथे लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भाऊ कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली इच्छूक उमेदवारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

सदरील बैठकीमध्ये अनेक इच्छूकानीं मनोगत व्यक्त केल्यानंतर सोमनाथ  कांबळे यानीं मार्गदर्शन करुन निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारांची यादी मंजूर करुन पुढील कार्यपध्दतीची जबाबदारी तालुका पदाधिकारी व उमेदवार यानां निश्चित केल्या आहेत.

नियोजित ग्रामपंचायती व उमेदवार याप्रमाणे अणदूर - (लक्ष्मण गायकवाड), बसवंतवाडी - (सुरेखा बाबु देडे),दहिवडी -( संजय गायकवाड), भातंब्री -(ज्ञानोबा कांबळे/विजय कांबळे/ बलभीम सगट),चिंचोली -(आण्णा जाधव),काळेगाव -(कालीदास भोवाळ),कसई -(कुंडलीक भोवाळ),सरडेवाडी -(ज्ञानेश्वर सगट),बीजनवाडी -(लक्ष्मण सगट),बारुळ -(सुरज सगट),सलगरा दि -(धर्मेद्र देडे),खडकी शिवाजीनगर -(सुरेश गायकवाड/पंडित गायकवाड),देवकुरळी -(उमेश गायकवाड),खानापूर -(आप्पा कांबळे),शहापूर -(भरत कांबळे),इटकळ -(नागेश क्षिरसागर/अजय गायकवाड),दिंडेगाव/टेलरनगर -(शेखर क्षिरसागर/शिवाजी क्षिरसागर), बाभळगाव -(यशोदा लोंढे/अंबुबाई कसबे)आदीं गावातील कामास सुरुवात करा असे कांबळे यानीं उपस्थित सर्वांना आदेशीत केले असून उर्वरित ग्रामपंचायतीचे उमेदवार लवकरच जाहीर होतील असे सांगितले आहे. 

यावेळी सुरज सगट, आप्पा कांबळे, वसंत सगट, ज्ञानोबा कांबळे, जयराज कांबळे, शेखर क्षिरसागर, सुर्यकांत भिसे, शिवाजी क्षिरसागर, लक्ष्मण गायकवाड, शिवाजी गायकवाड खानापूर, मल्लेश लोंढे, कालीदास भोवाळ, आप्पासाहेब जाधव, दत्तात्रय गायकवाड, सागर डोलारे, तात्यासाहेब गायकवाड केमवाडी, भगवान कांबळे, विकास देडे, सागर क्षिरसागर, गोपाळ कांबळे, सतिष देडे, रमेश क्षिरसागर, इंद्रजीत भालेराव, संजय वसंत गायकवाड ,याशीन शेख, विजय कांबळे, शाम देडे, सुरज गवळी, तानाजी देडे, सुनिल वाघमारे, संजय गायकवाड, संजय देडे तसेच उमेदवारी जाहीर झालेले इच्छूक उपस्थित होते.

 
Top