तुळजापूर, दि. 20 : गोरगरीब, दीन-दलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक पीडितांच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे संत गाडगेबाबा (डेबूजी झिंगराजी जानोरक) यांच्या 64 व्या स्मृतिदिनानिमित्त तुळजापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सागर कदम, जिवन कदम, लक्ष्मण कदम, कमलेश कदम, सुरज इटकर, कुणाल रोंगे, शाहीर नंदकुमार कदम सोमनाथ सोनवणे भैरव सोनवणे, अनमोल शिंदे, सुरेश मस्के, युवराज शिंदे, अनिकेत सोनवणे, दत्ता लोंढे उपस्थित होते.