तुळजापूर, दि. 15 : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मंगळवारी (दि. 15) भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. दरम्यान, पासची मर्यादा असल्याने भाविकांनी महाद्वारातुनच दर्शन घेऊन समाधान मानले.
पहाटेपासून तब्बल दहा हजार भाविकांनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यामध्ये दोन हजाराच्या जवळपास भाविकांनी पेड दर्शन घेतले व सात ते आठ हजार भाविकांनी धर्मदर्शन घेतले. पास संपल्यामुळे त्याहीपेक्षा महाद्वारातून दर्शन घेऊन जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त होती.