तुळजापुर : कुमार नाईकवाडी

पेट्रोल पंपावरील चोराना तात्काळ गजाआड करण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा तुळजाभवानी तुळजापुर तालुका पेट्रोल पंप असोसिएशनच्यावतीने तुळजापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक राठोड यांना देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. 5 डिसेंबर रोजी पहाटे 3 वाजता लातुर रोडवरील श्री भवानीशंकर पेट्रोल पंपाववरुन पेट्रोल-डिझेलचा टँकर अज्ञात  चोरटयांनी लातूर-सोलापूर बायपास वरती नेऊन त्या टँकरचे चारही चाके काढून नेले व पंपातील इतरही वस्तुंची चोरी केली. सदरील घटनेचा गुन्हा तुळजापूर पोलीस स्टेशन येथे नोंद झाला आहे. परंतु अज्ञात चोरट्याचा तपास संथगतीने चालु आहे. तरी श्री तुळजाभवानी पेट्रोल पंप असोसिएशनच्यावतीने या घटनेचा वेगाने तपास व्हावा व गुन्हेगार तात्काळ गजाआड करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनावर असोसिएशनचे गोपाळ देशमुख, विष्णू म्हात्रे, आनंद कंदले,  शिवाजी सोमाजी, ऋषिकेश हंगरगेकर,  मोहन गाडे व सहका-यांच्या स्वाक्षरी आहेत.

 
Top