उस्मानाबाद, दि. 08 : रहदारीस अडथळा व धोका होईल, अपघाताची शक्यता निर्माण होईल अशा रितीने रस्त्यावर वाहन उभे करणाऱ्या व्यक्तींविरुध्द दि. 07.12.2020 रोजी भा.दं.सं. कलम- 283 अन्वये 6 गुन्हे उस्मानाबाद पोलीसांनी नोंदवले.
यात 1)अशफाक मुजावर, रा. परंडा 2)शंकर किसन काळे, रा. वारदवाडी चौक, ता. परंडा या दोघांनी परंडा शहरात 2 ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी ऑटोरिक्षा उभा केला तर 3)सुनिल औताडे, रा. वांगी (बु.), ता. भुम यांनी मोटारसायकल व 4)अनिल खताळ, रा. नाडी, ता. माढा यांनी परंडा शहरात 2 ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी आपापल्या ताब्यातील वाहने उभी केल्याने नमूद चौघांविरुध्द 4 स्वतंत्र गुन्हे परंडा पो.ठा. येथे नोंदवण्यात आले. तर 5)ज्ञानेश्वर माळी, रा. मंगरुळ, ता. तुळजापूर यांनी टाटा मॅजीक वाहन व 6)महादेव दाभाडे, रा. करजखेडा, ता. उस्मानाबाद यांनी मिनीबस तुळजापूर शहरात 2 ठिकाणी रस्त्यावर मध्यभागी उभी केल्याने नमूद दोघांविरुध्द 2 स्वतंत्र गुन्हे तुळजापूर पो.ठा. येथे नोंदवण्यात आले.