तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मंगळवार दि. ८ डिसेंबर भाविकांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली होती. ततपुर्वी पहाटे १ वाजता श्री देवीजीचे चरण तिर्थ होऊन भाविकांसाठी दरवाजे खुले करण्यात आले होते. सकाळी ६ वाजता श्री देवीजीस दुग्धा पंचामृत अभिषेक घालुन श्री देवीस वस्ञोअलंकार घालुन आरती करवून अंगारा काढण्यात आला.
श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या ॲक्सिस पास काढून श्री देवीच्या मंदीरात प्रवेश करण्यासाठी महाद्वार पासुन भवानी रोड वरील भागात लांबच लांब रांग लागली होती. भवानी रोडवरील दुचाकी वाहनाच्या व चारचाकी वाहनाची मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीतुन भाविकांनी वाट काढून श्री देवीचे दर्शन घेतले. सायंकाळी मंदीर परिसरात मंगळवारचा छबीना काढण्यात आला.
सध्या कोरोना साथीच्या रोगामुळे श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान मार्फत लिमिटेड भाविकांना श्री देवी दर्शनासाठी सोडण्यात येत आहे. भाविकांची गर्दी होत असल्यामुळे मंगळवार शुक्रवार रविवार व पोर्णिमा या दिवशी भाविकांसाठी पहाटे १ वाजता दरवाजे खुले करण्यात येत आहेत व इतर वेळी पहाटे ४ वाजता श्री देवीचे दरवाजे खुले करण्यात येत आहेत.