तुळजापूर : सतीश महामुनी
तालुक्यातील आरळी बुद्रुक ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 अंतर्गत वार्ड क्रमांक 3 च्या एका जागेसाठी निवडणूक घोषित झाली अन या जागेसाठी किरण शामराव व्हरकट यांनी तालुक्यात सर्वाधिक 258 मतांची लीड घेत विजयश्री खेचून आणत त्यांच्या विरोधात उभा टाकलेले सुनील कृष्णात पारवे यांचा पराभव केला.
आरळी बुद्रुक ग्रामस्थांच्यावतीने विशेष ग्रामसभा बोलावून यंदा बिनविरोध सदस्यांच्या निवडी करण्यात आल्या होत्या परंतु वार्ड क्रमांक 3 च्या खुल्या प्रवर्गातील पुरुष गटासाठी एक फॉर्म भरला गेल्याने गावकऱ्यांना निवडणुकीला सामोरे जावे लागले, या अटीतटीच्या लढती मध्ये किरण व्हरकट यांनी सुनील पारवे यांचा 258 मतांनी पराभव केला.तसेच उर्वरित 8 सदस्यांमध्ये गोविंद रंगनाथ पारवे, संजय नागनाथ पाटील,भीमराव अर्जुन सोनवणे,सौ. मधुमती दादाराव पारवे,सौ. अश्विनी जनार्दन व्हरकट,सौ. ज्योती राहुल पौळ, सौ. मनीषा सिद्राम तानवडे, सौ.नशिबा फारुक शेख हे सदस्य विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून बिनविरोध निवडून आले होते.
आरळी बुद्रुक ग्रामस्थांच्यावतीने तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य काशिनाथ बंडगर,माजी उपसरपंच पापालाल सय्यद,सुधाकर काटकर, बजरंग कोकाटे, मकरंद बामनकर, छावाचे जिल्हाध्यक्ष महेश गवळी, शिवाजी यादव, विकास ज्योत,भास्कर पारवे, चेअरमन अनिल जाधव,हनुमंत व्हरकट,संजय पारवे, विकास ज्योत,बाबासाहेब भोसले आदींनी परिश्रम घेत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी व एका जागेसाठी लागलेल्या सदस्यांना निर्विवाद निवडून आणण्यासाठी परिश्रम घेतले.