काटी : उमाजी गायकवाड

काटी येथे २७ जानेवारी ला प्रजासत्ताक दिनानिमित्त बाचार चौक  काटी येथे निसर्ग काव्यमंच समुहाचे दुसरे ग्रामीण काव्यसंम्मेलनचे आयोजन करण्यात आले आहे.

उपक्रमशील शिक्षक तथा कवी वक्ते लेखक पंकज कासार काटकर यांच्या संकल्पनेतुन हे संम्मेलन होत असुन नवोदित कवि आणि कवियत्री यांनी संम्मेलनात सहभागी व्हावे अशी विनंती त्यांनी केली आहे.

कवी संमेलनाचे हे दुसरे वर्षे असुन "आमची माती आमची माणसे,आमच्या मातीतील काळजातील कविता"हा कवि संम्मेलनाचा विषय आहे...,कविसंम्मेलनाचे अध्यक्ष श्रीमती.विनिताताई कदम मुंबई ( मराठी साहित्य मंडळ बोरोवली विभाग मुंबई ) या असुन उदघाटक श्रीमती भाग्यश्री ताई खुटाळे कासार फलटण यांच्या हस्ते होणार आहे.

कवी संम्मेलनात सोलापुर ,मुंबई, लातुर, पुणे, उस्मानाबाद, पंढपुर ,सांगोला, सांगली, फलटण येथील कवी सहभागी होणार आहेत. तरी नवोदित कवींनी ही संम्मेलनात सहभागी व्हावे असे कवी पंकज कासार काटकर यांनी आवाहन केले आहे...

 
Top