नळदुर्ग , दि.20 :  हगलुर ता. तुळजापूर येथिल ग्रामपंचायत निवडणुकीत   अडॅ. सौ. रुपालीताई  पाटील-ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली दणदणीत विजयी मिळविलेल्या सदस्यांचा तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.

हगलुर  ग्रामपंचायत निवडणूकीत  7 जागेसाठी मतदान होवुन भाजप प्रणित  तुळजाभवानी ग्रामविकास पॅनेलचे अडॅ. जयपाल नालंदा पाटील, सौ. कौशल्याबाई आत्माराम घुगे. सौ. शीतल औदुंबर घुगे, महेश सोपान गवळी,  अलका डिकोजी पाटील असे  पाच उमेदवार विजयी झाले. तर परिर्वतन पॅनेलचे संजय  पोम पवार , रंजना संजय पवार  हे दोन उमेदवार निवडुन आले आहेत. 

दरम्यान विजयी झालेल्या तुळजाभवानी ग्रामविकास पॅनेलच्या उमेदवाराचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आले. यावेळी भाजपाचे तुळजापूर तालुकाध्यक्ष संतोष दादा बोबडे , पॅनल प्रमुख नालंदा पाटील, संतोष दराडे, प्रभाकर कांबळे  यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 यावेळी राज्यमार्ग ते हगलूर गावापर्यंतचा अडीच कि.मी.  रस्ता खराब झाल्याने  त्याची दुरूस्ती व गावातील  इतर समस्या   लवकरच सोडविण्याचे आ.पाटील यानी आश्वासन नवनिर्वाचीत सदस्याना सत्कारप्रसंगी दिले. काम सुरू होईल असे सांगितले.
 
Top