जळकोट, दि.१९ :
विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना, राजीव गांधी नगर मुरुम येथे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पाणी पुरवठा मंत्री संजय बनसोडे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी विठ्ठल साई परिवाराकडुन संजय बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे,जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष विजयकुमार सोनवने,माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप भालेराव, उमरगा पंचायत समिती सभापती सचिन पाटील,संचालक माणिकराव राठोड,मुरूम नगराध्यक्ष अनिता अंबर उमरगा नगर परिषद नगराध्यक्षा सौ.प्रेमलाता टोपगे, जि.प.सदस्य रफीक तांबोळी, उपनगराध्यक्ष सहदेव गायकवाड, माजी नगराध्यक्ष रशीद शेख,सुधीर अंबर,माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे,नगरसेवक सुजित शेळके,अँड ईनामदार,भालचंद्र लोखंडे, रुकम्मना पवार आदी उपस्थित होते.