नळदुर्ग ,दि. २० :   येथील  कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयासमोर  महामार्गावर  बुधवारी  सकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान कार व टँकरचा आपघात झाला असुन कारचालक जखमी झाला आहे.

 सोलापूरकडे जाणाऱ्या    टँंकरला ओव्हरटेक करताना झालेल्या आपघातात कार चालक गंभीर जखमी झाला. आपघातावेळी कार तीन वेळा पलटी झाल्याचे  घटनास्थाळावरुन प्रत्यक्षदर्शी पाहणा-यांनी सांगितले.  येथील जवळच असलेल्या महामार्ग पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी ड्रायव्हरला बाहेर काढून नळदुर्ग प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठवले. या मार्गाचे रूंदीकरण झाल्यामुळे वाहने सुसाट धावत असून नेहमी आपघात होत आहेत. यामुळे नागरिकांनी व महामार्ग पोलीसांनी गतीरोधक बसवण्याची मागणी वेळोवेळी केली आहे. सध्या रस्ता सुरक्षा अभियान सुरु आहे. माञ या आठवड्यातील हा दुसरा आपघात या मार्गावर झाला आहे.

    सोलापूरच्या दिशेने जात  असलेल्या  जी.जे. १२ ए.डब्लू ००९१ या टँकरला ओव्हरटेक करताना जोरदार धडक लागून टी.एस. १५ ई.व्ही.४५४८ ही कार पलटून कारचालक प्रतिक सोनवणे ( वय ३५ रा. दापोडी, पुणे) हे गंभीर जखमी झाले तर कारचे मोठे नुकसान झाले. महामार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक हनुमंत कवले, पो.ना. आर.बी.कदम, नितीन सुरवसे, परमेश्वर मुपडे, आल्ताफ गोलंदाज, राहूल वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी  कार चालकास प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी सोलापूरला पाठवले.

 नळदुर्ग बसस्थानक ते गोलाईपर्यंत ( तुळजापूर फाटा) गतीरोधक बसवण्याची मागणी वेळोवेळी करण्यात येत आहे.
 या मार्गावर  रूंदीकरण केल्यामुळे वाहने वेगाने जात असल्यामुळे नेहमी आपघात होत आहेत. मागील महिन्यात अणदुर येथील रिक्षाचालक तरूणाचा दुर्दैवी अंत झाला.  आपघाताची मालिका सतत सुरू आहे. यामुळे  या मार्गावर  गतीरोधक बसवण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे.
 
Top