तुळजापूर ,दि.२०: गोंधळवाडी ता.तुळजापूर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये श्री .धुळदेव ग्रामविकास पॕनेलला धुळ चारत श्री संत बाळूमामा ग्राम विकास पॅनलच्या उमेदवाराचे दणदणीत विजय मिळविले आहे.
तुळजापूर तालुक्यातील गोंधळवाडी ग्रामपंचायतीच्या ७ जागेसाठी निवडणुक झाली. यामध्ये महा विकास आघाडी व श्री संत बाळूमामा ग्राम विकास पॅनल असे मिळुन एकुण १४ उमेदवार निवडणुक रिंगणात होते. उमेदवार विजयी झाले आहेत या विजयासाठी पॅनल प्रमुख अमृत मोटे, पोपट मोटे, गावातील सर्व आजी-माजी सदस्य युवक वर्ग यानी परिश्रम घेतले.
श्री संत बाळूमामा ग्रामविकास पॅनल गोंधळवाडी विजयी उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे - सविता उमेश मोटे , कालींदा गुलचंद माने , गोपाळ विष्णू मोटे , राजाभाऊ (भगवान) बलभीम मोटे, रूक्मीणबाई विश्वनाथ मोटे,कल्पना सोमाजी सातपुते , भैय्या राजेंद्र पारसे इत्यादी.
यावेळी मावळते सरपंच लक्ष्मी संदिपान मोटे निवडून आलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे गावातील मान्यवरानी सर्वांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.