नळदुर्ग , दि.२० : सुरेखा हनुमंत बनकर ह्या सन-2017 मध्ये झालेल्या निवडणुकीतून थेट जनतेतून सरपंच म्हणून करजखेडा ता. उस्मानाबाद जि. उस्मानाबाद निवडून आल्या होत्या.
दि. 13/10/2020 रोजी इतर ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव घ्यावा म्हणून तहसीलदार उस्मानाबाद यांचे कडे अर्ज केला.
दि. 19/10/2020 रोजी तहसीलदार उस्मानाबाद यांनी ग्रामपंचायत कार्यालय करजखेडा येथे ग्रामपंचायत सदस्यांची मीटिंग घेवून अविश्वास ठरावास हात वर करून मतदान सांगितले व मतदान झाल्यावर सरपंचाविरुद्ध 10 - 01 असा अविश्वास ठराव मंजूर झाला असे आदेशीत केले सदर अविश्वास ठरावा विरुध्द सुरेखा बनकर ह्या जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांचेकडे अपील केले असता सदर अविश्वास ठराव गृहीत धरून ग्रामसभा घेण्याचे दि. ३१ डिसेंबर 2020 रोजी आदेशीत केले.
सदर जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याविरुद्ध निकाला विरुद्ध सुरेखा बनकर यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका क्र. व्ही पी /238/2021 करून न्याय देण्याची विनंती अँड. दयानंद एस. माळी यांच्या मार्फत केली.
सदर याचिका सुनावणीस आली असता मा. न्यायालयास खालील गोष्टी दाखवून देण्यात आल्या.
सदर सरपंच हे जनतेतुन निवडून आल्यामुळे त्यांच्या विरुध्द फक्त ग्रामपंचायत सदस्यांनी घेतलेला अविश्वास ठराव हा कलम 35(ब) ग्रा. पं. अधिनियमास विसंगत असून त्यांना गावची ग्रामसभा घेऊन मतदान गुप्तपणे घ्यावे लागते परंतू असे न करता फक्त ग्रा. पं. सदस्यच यांनी मतदान केले व इतर गावकऱ्याना सदर प्रक्रियेत सामावून घेतले नाही असे निदर्शनास आणून दिल्यानंतर मा. उच्चन्यायलयाने सदरील अविश्वास रद्द ठरवून पुन्हा याचिकाकर्ते हेच सरपंच पदास पात्र असून, ठराव बेकायदेशीर आहे असे मत उच्चन्यायलयाचे न्या. व्ही .के. जाधव यांनी दिले.
याचिका कर्त्यातर्फे डी.एस माळी यांनी तर शासनातर्फे आर. डी. सानप आणि प्रतिवादी उपसरपंच व सदस्यांकडून अॕड . विक्रम उंदरे यांनी काम पाहिले.