नळदुर्ग, दि.२०: 
 मनसेचे प्रदेश सरचिटणीस,जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप (बापू)धोत्रे यांच्या हस्ते मनसे दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आहे, कार्यक्रमाच्या प्रारंभी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांचा सत्कार करण्यात आला,नळदुर्ग शहरातील आवेज इनामदार,मोईज इनामदार यांच्यासह मिनहाज सयद, अरबाज शेख, करीम सयद,निजम इनामदार, मुदसर सय्यद, पटेल अ. जकी. यांचा दिलीप धोत्रे यांच्या हस्ते प्रवेश झाला. याप्रसंगी धोत्रे  यांनी  आगामी पालिका निवडणूकीसाठी सर्व पदाधिका-यांनी तयारी करावे असे सांगितले .

 या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर,सोलापूर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, मनविसे जिल्हाध्यक्ष अमर कुलकर्णी, धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष अविनाश साळुंखे, जिल्हा सचिव ज्योतीबा येडगे, लोहारा तालुकाध्यक्ष  अतुल जाधव, तुळजापूर तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार,जनहित कक्ष व विधी विभागाचे ॲड. मतीन बाडेवाल,उमरगा शहराध्यक्ष हेमंत बनसोडे, नळदुर्ग शहराध्यक्ष अलिम शेख, शहर सचिव  प्रमोद कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष रमेश घोडके, अभिजित शिंदे,  जयकुमार घोगरे, राजमाने, निखिल येडगे, अमीर फुलारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रमोद कुलकर्णी यांनी केले,तर आभार ज्योतीबा येडगे यांनी मानले.
 
Top