जळकोट, दि. ५ : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील केदारलिंग भागातील शिस्तबद्ध व समाज प्रबोधन करून मिरवणूक काढण्यात सतत पहिल्या क्रमांकावर असलेल्या जय महाकाल गणेश मंडळाच्या गणेश मंदिराचे बांधकामाचे भूमिपूजन जळकोट येथील श्री सिद्धेश्वर देवस्थान कट्टीमठ संस्थानचे मठाधिपती ष. ब्र.१०८ श्री. श्री. श्री. शिवानंद शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश सोनटक्के, माजी उपसरपंच बंकट बेडगे, माजी ग्रा. प. सदस्य अनिल छत्रे, मार्गदर्शक महादेव किल्लारे, प्रकाश सगर, लिंबाजी चंदे, जय महाकाल गणेश मंडळाचे अध्यक्ष शिवाजी कुंभार, मंडळाचे खजिनदार पांडुरंग आनंदे, महादेव धनशेट्टी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, गणेश भक्त, कार्यकर्ते व मंडळातील बालगणेश उपस्थित होते.