उस्मानाबाद, दि. 08 : जिल्हयातील 50 टक्क्यांपेक्षा अधिक ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत.त्यामुळे संपूर्ण उस्मानाबाद जिल्हयामध्ये आचारसंहितला लागू आहे.त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात नगरपालिका/नगरपरिषद हद्दीमध्ये आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित नगरपालिका,नगरपरिषद,नगरपंचायतच्या मुख्याधिकारी यांची आचारसंहिता प्रमुख म्हणून घोषणा केली आहे.यात उस्मानाबाद, तुळजापूर, नळदुर्ग, उमरगा, मुरुम, लोहारा, कळंब, वाशी, भूम, परंडा, नगर परिषदेचा समावेश आहे.       

एप्रिल ते डिसेंबर-2020 या कालावधीत मुदती संपलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी संगणकीकृत पध्दतीने राबविण्यासाठी प्रत्यक्ष निवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे.त्यानुसार संबंधित तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठीची निवडणुक प्रक्रिया सुरु झाली आहे.आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आचारसंहिता प्रमुख म्हणून उस्मानाबाद,तुळजापूर,उमरगा, लोहारा, कळंब, वाशी,भूम,परंडा संबंधित पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी यांची याद्वारे नेमणूक करण्यात आली आहे.

 
Top