उस्मानाबाद, दि. 03 : उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, उस्मानाबाद अंतर्गत कळंब, लोहारा आणि तुळजापूर तालुक्यातील प्रेरिका यांचे तीन दिवसीय निवासी उजळणी प्रशिक्षण दि. ३१/१२/२०२० ते दि. ०२/०१/२०२१ या कालावधीत उस्मानाबाद येथे पार पडले. 

प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी डॉ. विजयकुमार फड,  जिल्हा अभियान संचालक उमेद तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद आणि डॉ. हनुमंत वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी, उस्मानाबाद हे उपस्थित होते.  समारोप प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. विजयकुमार फड यांनी विविध शासकीय योजनांची माहिती गावातील गरीब आणि गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचवून त्याचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करावे असे आवाहन केले. तसेच स्वतःचे घर आणि परिसर स्वच्छ ठेऊन आणि वृक्षारोपण करून गावाचे वातावरण प्रसन्न ठेवावे. अंगणवाडी, शाळा, दवाखाने या शासकीय सेवा आणि ग्राम पंचायत यांच्यासोबत समन्वय ठेवून लोकांना चांगल्याप्रकारे सेवा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. 

याप्रसंगी जिल्हा अभियान व्यवस्थापक, समाधान जोगदंड, जिल्हा व्यवस्थापक, क्षमता बांधणी, अल्ताफ जिकरे, जिल्हा व्यवस्थापक MIS, अमोल सिरसट, तालुका व्यवस्थापक, क्षमता बांधणी, तेजस कुलकर्णी, चंद्रकला कनकी तसेच प्रशिक्षक पुष्पा आवाड, शकुंतला बनसुडे, रुपाली शेंडगे, अलका मोरे आदीजण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तेजस कुलकर्णी यांनी तर प्रस्ताविक अल्ताफ जिकरे यांनी केले. आभार प्रदर्शन समाधान जोगदंड यांनी केले.

 
Top