तुळजापूर, दि. 3 :  सन १९९१ ते २०००दरम्यान विद्यापीठाच्या सक्षम निवड समिती मार्फत नियुक्त झालेल्या बिगर नेट-सेट प्राध्यापकांना महाराष्ट्र विद्यापीठ कायदा-१९९४ अथवा विद्यापीठाच्या परिनियमात  दुरूस्ती नसल्याने दि. ४ एप्रिल २००० पर्यंत नेट/सेट ही  शैक्षणिक पात्रता कायद्याने लागू नव्हती, त्यामुळेच यूजीसीने दि.४ नोव्हेंबर २००८ मध्ये १९९१ ते २००० दरम्यानच्या प्राध्यापकांना नेट/सेट मधून विनोद सूट दिलेली आहे ,परंतु उच्च शिक्षण विभागातील प्रशासकीय बाबूंच्या आडमुठ्या भूमिकेमुळे लागू नसलेली नेट /सेट ची अट लागू करून या प्राध्यापकांना कॅस चे लाभ नाकारण्यात आले.

नेट-सेट संघर्ष समितीच्या माध्यमातून १९९८ पासून हा प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु वेळोवेळी या प्रश्नाला खीळ घालण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळेस एमफुक्टो व सुटा  या संघटनेने केलेला आहे. वास्तवात १९९९ ला पाचवा वेतन आयोग लागू करून घेत असताना या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नेट/सेटची अट तत्त्वतः मान्य करून पाचवा वेतन आयोग लागू करून घेतला.

२००९ मध्ये सहाव्या वेतन आयोगाच्या वेळेस नेट/सेट मधून सूट देण्याचा चुकीचा आग्रह महाराष्ट्र शासनाकडे धरून ४५ दिवस संप करण्यात आला, वास्तवात२००८ मध्ये यू.जी.सी.ने नेट-सेटमधून सूट दिलेली असताना देखील चुकीचा आग्रह महाराष्ट्र शासनाकडे धरण्यात आला.

नेट/सेट संघर्ष समितीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात महाराष्ट्र शासनाच्या विरोधात २०१० मध्ये याचिका दाखल केली,दि.१ ऑगस्ट २०१३ मध्ये प्राध्यापकांच्या बाजूने उच्च न्यायालयाने निर्णय दिला, या निर्णयानंतर एमफुक्टोचे तत्कालीन अध्यक्षांना नेट/सेट संघर्ष समितीच्या वतीने विनंती करण्यात आली की, कोर्टात जाण्याची भाषा न करता उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा  आदर करून संघटनेने शासनाला धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आग्रह धरावा अशी विनंती करण्यात आली , परंतु केवळ आणि केवळ संघटनेच्या आडमुठ्या भूमिकेमुळे सर्व प्राध्यापकांना उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागले.

प्रत्येक आंदोलनावेळी नेट-सेटग्रस्त नसलेल्या सेवानिवृत्त असलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी नेट चा प्रश्न भिजत ठेवला पाचवा वेतन आयोग सहावा वेतन आयोग सातवा वेतन आयोग असो नेट चा प्रश्न पुढे करून आंदोलन केली गेली व स्वतःचे उखळ पांढरे करून घेतले यामुळे नेट-सेट प्राध्यापकांच्या पदरी केवळ निराशा आणि निराशाच आली एवढ्यावर न थांबता संघटनेचे प्राध्यापकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे चे काम केले यावरून हेच स्पष्ट होते की नेट/सेटचा प्रश्न सुटू द्यायचा नाही, जर हा प्रश्न सुटला तर संघटनेकडे दुसरा प्रभावी मुद्दा शिल्लक राहणार नाही.

नेट/सेट  संघर्ष समितीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील नेट-सेटग्रस्त प्राध्यापकांना एकत्रित करून हा वर्ष प्रश्न तडजोडीच्या माध्यमातून सोडवण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.ना. उदयजी सामंत साहेबांना दि.२९ फेब्रुवारी २०२० रोजी निवेदन देऊन धोरणात्मक निर्णय घेण्याचा आग्रह धरण्यात आला. कोरोना महामारीच्या भयानक  परिस्थितीदेखील मंत्रिमहोदयांनी दि.१३ जुलै रोजी या प्रश्नाबाबत ऑनलाईन बैठक घेऊन प्रशासनाला तात्काळ माहिती संकलित करण्याचे आदेश दिले.

दि.१ ऑगस्ट २०२० रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष कथा अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष ना. ज.मो. अभ्यंकर  यांच्या अध्यक्षतेखाली व आ. मनीषा कायंदे  यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये नेट सेट संघर्ष समितीची झूम ॲपवर ५०० प्राध्यापकांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली , लागलीच अभ्यंकर साहेबांनी नेट/सेट संघर्ष समितीने तडजोडी बद्दल दिलेल्या निवेदनाच्या आधारे सविस्तर निवेदन तयार करून मंत्री महोदयांची भेट घेऊन विस्तृतपणे चर्चा करून लवकरात लवकर या प्रश्नाबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची विनंती केली.

प्रदेशाध्यक्ष अभ्यंकर  येथेच न थांबता शिवसेनेचे सचिव खा. अनिल देसाई  व खा.विनायक राऊत  तसेच महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री ना.सुभाष देसाई  यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत , हा प्रश्न सुटण्याच्या उंबरठ्यावर पोहोचलेला असतानाच सुटा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्रीमहोदयांच्या हस्तक पैसे गोळा करत आहेत असा गलिच्छ आरोप करत आहेत जेणेकरून मंत्रीमहोदयची बदनामी करायची व हा प्रश्न रेंगाळत ठेवण्याचाच सुटा संघटनेचा प्रयत्न असणार आहे .

नेट /सेट चा प्रश्न तडजोडीच्या माध्यमातून सुटण्यासाठी नेट/सेट संघर्ष समिती व महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना केंद्रस्थानी असून प्रशासनाकडून अथवा महोदयांच्या हस्तेकाकडून पैसे गोळा करणेबाबत कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नसताना मंत्री महोदयांची पर्यायाने शिवसेनेची बदनामी करण्याचे हे षडयंत्र असून,असे गलिच्छ आरोप करणाऱ्या सुटा संघटनेचा नेट सेट संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष डॉ गोविंद काळे, उपाध्यक्ष डॉ आशा बिडकर यांनी केला आहे.

 
Top