तुळजापूर, दि. 03 : येथील श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य विभागाचे प्रयोगशाळा सहाय्यक चंद्रकांत गुंडेराव ओवरीकर हे छत्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. यानिमित्त महाविद्यालयाच्या वतीने त्यांना निरोप समारोप देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर जगदे हे होते तर प्रमुख उपस्थित म्हणून उपप्राचार्य रवी मुदकन्ना, विभाग प्रमुख प्रा. प्रदीप हंगरगेकर व प्रबंधिका सुजाता कोळी हे उपस्थित होते. निरोप सत्कारानंतर चंद्रकांत ओवरीकर यांनी महाविद्यालयातील छत्तीस वर्षाच्या काळातील काही महत्त्वपूर्ण घटना मनोगतात व्यक्त करून सर्वांचे आभार मानले .यावेळी सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.