तुळजापूर : निलेगांव, ता. तुळजापूर येथील शैल्या हाटेल्या शिंदे हा तामलवाडी पो.ठा. गु.र.क्र. 65 / 2010 या घरफोडीच्या गुन्ह्यात पोलीसांना गेली 10 वर्षापासून हवा होता. दरम्यानच्या काळात त्याने तामलवाडी गु.र.क्र. 83 / 2014 हा दरोड्याचा गुन्हा केल्याचा आरोप होता. या दोन्ही गुन्ह्यात पोलीस त्याचा शोध घेत होते. तो निलगांव शिवारातील टेकड्यांच्या भागात आला असल्याची गोपनीय खबर स्था.गु.शा. च्या पथकास मिळताच पथकाने 24 जानेवारी रोजी टेकड्यांच्या परिसरात सापळा लावला. पोलीसांना पाहता क्षणी शैल्या याने धुम ठोकली असता पोलीसांनी त्याचा पाठलाग करुन त्यास पकडले. हि कारवाई पोउपनि- श्री सदानंद भुजबळ, पोहेकॉ- काझी, पोना- शेळके, सर्जे, संतोष गव्हाणे, पोकॉ- बलदेव ठाकुर यांच्या पथकाने केली आहे.