ताज्या घडामोडी



तुळजापूर , दि. २५ : 

तुळजापूर तालुक्याच्या ठिकाणी महिला तक्रार निवारण केंद्र ( पोलिस प्रशासन ) पुन्हा तालुक्याच्या ठिकाणी चालू करण्याच्या मागणीचे निवेदन बळीराजा पार्टीचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब रोडे यांनी दि. २५ जानेवारी रोजी तहसिलदार मार्फत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना देण्यात आले आहे. 


निवेदनात  पुढे नमूद केले आहे की, तालुक्याच्या ठिकाणी महिला निवारण कक्ष बंद करून जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या कार्यालयात चालू करण्यात आले आहे. तरी महिलांवरील अन्याय-अत्याचार तक्रारीची दखल ज्या त्या तालुक्याच्या ठिकाणी घेण्यात यावी व त्या महिलांना न्याय देण्यात यावा यासाठी तालुक्याच्या ठिकाणी महिला तक्रार निवरण कक्ष चालू करण्यात यावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे  देण्यात आले आहे. या निवेदनावर बळीराजा पार्टीचे जिल्हाध्यक्ष तात्या साहेब रोडे यांची स्वाक्षरी आहे.
 
Top