उस्मानाबाद, दि. 04 : उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिनानिमित्त पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सत्कार तसेच पत्रकारांना विम्याचे वाटप आणि कोरोनानंतरचा उस्मानाबाद जिल्हा - व्हिजन 2021 या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. 

शहरातील समर्थ सभागृहात मंगळवार दि. 5 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता होणाऱया या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कौस्तूभ दिवेगावकर, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.  

दर्पण दिनानिमित्त होणाऱया या कार्यक्रमात नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी पत्रकारांना काढून दिलेल्या विमा पॉलिसीचे वाटप करण्यात येणार आहे. त्या बरोबरच मागील वर्षभरात उत्कृष्ट कार्य केलेल्या पत्रकारांचा सत्कार केला जाणार आहे.  

कोरोनानंतरचा उस्मानाबाद जिल्हा - व्हिजन 2021 या विषयावर परिसवांद आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास जिह्यातील पत्रकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख, सरचिटणीस भीमाशंकर वाघमारे यांच्यासह पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

 
Top