नळदुर्ग, दि. 04 : नळदुर्ग हद्दीत मौजे धनगरवाडी शिवारात यशवंत कांबळे यांचे शेताजवळ NH 65 रोडवर अंदाजे 45 ते 50 वर्ष वयाच्या वेडसर अनोळखी इसमास सोलापूर कडून येणाऱ्या अज्ञात वाहनाने दिनांक 03.01.2021 रोजी रात्री 8:28 वाजण्याच्या पूर्वी जोराची धडक दिल्याने त्यात सदर अनोळखी इसम हा गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाला आहे. सदरील अनोळखी इसम हा आपल्या पोस्ट हद्दीतील असल्याचं पोलीस ठाणे नळदुर्ग येथे कळविणे असे विनंती आहे.