हन्नुर : नागराज गाढवे

अक्कलकोट तालुक्यातील डोंब रजवळगे ग्रामपंचायत निवडणुकीत श्री महालक्ष्मी शेतकरी शेतमजूर कामगार आघाडीने ९ पैकी ७ जागा जिंकून ग्रामपंचायतवर वर्चस्व प्रस्थापित केले. 

डोंब रजवळगे ग्रामपंचायत निवडणूक श्री महालक्ष्मी शेतकरी शेतमजूर कामगार आघाडी आणि श्री महालक्ष्मी महाविकास आघाडी यांच्यात दुरंगी लढत झाली शेतकरी शेतमजूर कामगार आघाडीचे गौराबाई उदगीरे दिपाली गायकवाड आणि गीतांजली नारायणकर हे उमेदवार बिनविरोध निवडून आले डोंब रजवळगे ग्रामपंचायत निवडणुकीत सहा जागांसाठी निवडणूक झाली.

 या निवडणुकीत श्री महालक्ष्मी शेतकरी शेतमजूर कामगार आघाडीचे उमेदवार चिदानंद माळगे रुपाली सुलगडले श्रीदेवी सवळे आणि शिवलाल नारायणकर हे विजयी झाले  तर नागनाथ भोळे व रुक्मिणी माशाळकर हे उमेदवार पराभूत झाले व श्री महालक्ष्मी महाविकास आघाडीचे उमेदवार हसीना फकीर आणि रतन शिंदे विजयी झाले आणि शितल चिवरे विरेश्री सुलगडले दाऊद मकानदार संदीप गायकवाड हे पराभूत झाले या निवडणुकीत गजानंद जकीकोरे आणि उत्तम गायकवाड या अपक्ष उमेदवारांचा ही पराभव झाला वार्ड क्रमांक एक मध्ये चिदानंद माळगे आणि शितल चिवरे यांची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. पण चिदानंद माळगे यांनी बाजी मारली.

डोंब रजवळगे ग्रामपंचायत निवडणूक तालुक्यातील प्रतिष्ठेची ठरली होती संपूर्ण तालुक्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते श्री महालक्ष्मी शेतकरी शेतमजूर कामगार आघाडीचे रामचंद्र माळगे यांनी गावातील सर्व धर्मीय नागरिकांना एकत्रित करून आघाडी तयार केली आणि डोंबरजवळगे ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन केले गावातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी आघाडी तयार करून ग्रामपंचायत निवडणूक लढविली आहे. यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाची ग्रामपंचायतीवर वर्चस्व नसल्याचे शिवबाळ सुलगडले यांनी सांगितले.

 डोंब रजवळगे ग्रामपंचायत निवडणुकीत श्री महालक्ष्मी शेतकरी शेतमजूर कामगार आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी निंगण्णा चिवरे प्रकाश माळी सत्यवान गायकवाड तिप्पणा चिंचो ळी यशवंत पाटील ज्योतीबा शिंदे परमेश्वर  होदलुरे आदींचे सहकार्य लाभले आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी डोंबर जवळगे ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन केले आहे..

 
Top