नळदुर्ग : एस.के. गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील मौजे गंधोरा ग्रा.प.सार्वत्रिक निवडणूकीत रिपाइंचे (आठवले)तुळजापूर तालुका उपाध्यक्ष विठ्ठल जेटीथोर हे प्रचंड बहुमताने विजयी झाले आहेत.
गंधोरा ग्रामपंचायतची एकून ९ जागेसाठी पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक झाली या निवडणूकीत विठ्ठल जेटीथोर यांनी प्रभाकर श्रीपती भोसले यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या ग्रामविकास पँनेल मधून ग्रा.प.सदस्यत्वाची निवडणूक लढविली होती. या पँनेलला ९ च्या ९ जगेवर घवघवीत यश मिळाले असून यामध्ये रिपाइंचे विठ्ठल जेटीथोर हे २४६ मताधिक्याने विजयी झाले आहेत.त्यांच्या या विजया बद्दल रिपाइ़चे मराठवाडा विभाग उपाध्यक्ष आनंद पांडागळे,जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ,जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम,जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष दुर्वास बनसोडे, तुळजापूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे,रिपाइंचे अरुण लोखंडे,प्रकाश कदम ,अरुण कदम ,दत्तात्रय बनसोडे,ग्रामविकास पँनेल गंधोराचे पँनेल प्रमुख प्रभाकर भोसले सह ग्रामस्थानी आभिनंदन केले आहे.