तुळजापूर, दि. 01 : जि.प. प्रशाला आरळी (बु.) येथील गणित विषयाचे गाढे अभ्यासक गोपीनाथ विश्वनाथ माने हे ३३ वर्ष अखंड सेवा करून स्वेच्छा सेवानिवृत्त झाले. त्यांना  निरोप देण्यात आला.

गोपीनाथ  माने शैक्षणिक कार्यकालामध्ये गणित विषयाचे उत्तमरीत्या अध्यापन केले तसेच ते विद्यार्थ्याशी एकरूप होऊन प्रामाणिकपणे आपल्या कर्तव्याची भूमिका बजावत होते.

यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मण कचरे, उपाध्यक्ष  संजय गवळी, सम्राट पारवे, गोविंद पारवे, संजय पारवे,प्रशालेचे  मुख्याध्यापक दिपक सोनवणे,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 
Top