तुळजापूर, दि. 1 : तुळजापूर वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड. जयवंत इंगळे यांची बिनविरोध निवड शुक्रवारी झाली.
येथील वकील संघाच्या कार्यालयात 2021 या वर्षाची कार्यकारीणीची निवड करण्यात आली. वकील संघाच्या मावळत्या अध्यक्षा अॅड अर्चना मोहोळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत वकील संघाचे सदस्य अॅड गिरीश शेटे आणि अॅड नागनाथ कानडे यांनी नवीन कार्यकारीणीबद्दल सूचना केली. त्यामध्ये नवीन कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली. उपाध्यक्ष अॅड दत्तात्रय घोडके, सचिव अॅड शीला कोळेकर, सहसचिव अॅड बालाजी देशमाने यांची निवड करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ वकील अॅड तानाजी तांबे, अॅड किशोर कुलकर्णी, अॅड संजय पवार, अॅड जगदीश कुलकर्णी, अॅड एन.व्ही कदम, अॅड नीलकंठ वट्टे, अॅड दादासाहेब कदम, अॅड के.बी. कुलकर्णी, अॅड एस.के. कुलकर्णी, अॅड शिरीष कुलकर्णी, अॅड सदानंद आलुरकर,अॅड विश्वास डोईफोडे आदी उपस्थित होते.