तुळजापूर, दि. 01 : तुळजापूर पो.ठा. चे पोउपनि- श्री विकास दांडे हे पथकासह दि. 31.12.2020 रोजी 9 वा. तुळजापूर शहरात रात्रगस्त करत होते. यावेळी 1)माणिक राजेंद्र लोंढे, रा. तुळजापूर हा 21.05 वा. शहरातील साप्ताहीक बाजार परिसरात मो.सा. एम.एच. 25 एएम 6571 ही मद्यधुंद अवस्थेत चालवत असतांना तर 2)विनायक संभाजी इंगळे, रा. तुळजापूर हा दि. 01.01.2021 रोजी रात्री 00.45 वा. तुळजापूर शहरातील जुने बसस्थानक येथे स्कुटर क्र. एम.एच. 25 एएम 8162 ही मद्यधुंद अवस्थेत चालवत असतांना आढळला. यावरुन पोउपनि- श्री विकास दांडे यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खरेवरुन नमूद दोघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 185 अंतर्गत स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

 
Top