जळकोट :  मेघराज किलजे 

तुळजापूर तालुक्यातील जळकोटवाडी (नळ) गावच्या ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी सरपंच वसंत रामा पवार हे ग्रामविकास पॅनेल मधून निवडणूक मैदानात उतरले असून, मागील पाच वर्षांपूर्वीच्या केलेल्या विकासकामांमुळे आपला विजय निश्चित असल्याचे एका मुलाखतीत सांगितले.

जळकोटवाडी(नळ) ग्रामपंचायत निवडणूक सध्या पार पडत आहे. या निवडणुकीत दोन पॅनल एकमेकांविरुद्ध निवडणूक मैदानात उतरले आहेत. दोन गटात तुल्यबळ लढत पहावयास मिळत आहे. मागील पाच वर्षापासून जनतेशी कायम  ठेवलेला संपर्काच्या जोरावर गावचे माजी सरपंच वसंत पवार हे  शिवाजी काळे यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनल मधून वार्ड क्रमांक एक मधून निवडणूक लढवत आहेत. 

एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, यापूर्वी आपण पाच वर्ष गावची सेवा केली आहे. आपण केलेल्या विकासकामांमुळे गावची सुधारणा झाली आहे. सरपंच पदावर असताना सर्वसामान्यांना न्याय दिला आहे. सर्व जाती धर्मासाठी भरीव कार्य केले आहे. केवळ जनसेवा करण्यासाठी आपण मैदानात उतरलो आहोत. एक वेळ पंचायत समितीची निवडणूक लढवली आहे. त्याचा फायदा आपल्याला या निवडणुकीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वसंत पवार हे बंजारा समाजाचे असून, सरपंच पदावर असताना तांड्यातील केलेल्या सुविधेमुळे जनता आपल्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. जळकोटवाडी ग्रामपंचायतच्या या निवडणुकीत वसंत पवार हे विरोधकांना आसमान दाखवणार का? हे पाहणे जरुरीचे आहे.

 
Top