अचलेर : जय गायकवाड
ग्रामीण भागातील खेळाडूंना चालना देण्यासाठी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते युवा नेते शरण बसवराज पाटील यांच्या संकल्पनेतुन शरण पाटील मित्रमंडळाच्या वतीने मुरूम येथे भव्य काका चषक खुल्या टेनिस बॉल डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन दिनांक २१/१/२०२१ रोजी सायंकाळी ७ वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील साहेब यांच्या हस्ते मोठ्या थाटात मुरुम येथे संपन्न झाले.
यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील,उस्मानाबाद जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते शरण पाटील,जि.प.माजी सदस्य दिलीप भालेराव,मुरूमच्या नगराध्यक्षा सौ अनिता अंबर, उमरगा पालिकेच्या नगराध्यक्षा सौ प्रेमलता टोपगे,उमरगा पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील,जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष विजयकुमार सोनवने,प्राचार्य दिलीप गरुड,जिल्हा परिषदेचे सदस्य रफिक तांबोळी उपनगराध्यक्ष सहदेव गायकवाड,मुरूम सोसायटीचे चेअरमन दत्ता चटगे,उपप्राचार्य सुधीर अंबर, माजी नगराध्यक्ष बबन बनसोडे,युवक काँग्रेसचे महालिंग बाबशेट्टी,योगेश राठोड,पं.स.माजी सदस्य उल्हास घुरगुरे,नगरसेवक रशीद शेख,आयुब मासुलदार,सुरेश शेळके,सिद्धलिंग स्वामी,इब्राहिम नदाफ,नाना बेंडकाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या संघास एक लाख रुपये रोख व चषक,द्वितीय येणाऱ्या संघास पन्नास हजार रुपये रोख व चषक व तिसरे बक्षिस एकतीस हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
आयोजक-शरणजी पाटील मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी , माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे,मुरुम काँग्रेस शहराध्यक्ष सुधिर चव्हाण,उमरगा तालुका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल वाघ,विर भगतसिंग विद्यार्थी संघटनेचे किरण गायकवाड,युवक काँग्रेसचे गौस शेख,देवराज संगुळगे,राजु मुल्ला,झुंबर गायकवाड,प्रशांत मुरुमकर,शिवा दुर्गे,प्रज्वल गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.