नळदुर्ग ,दि.२२:
तुळजापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी आशिष लोकरे यांना धक्का बुक्की करण्यात आल्या निषेधार्थ नळदुर्ग नगरपालिकेतील कर्मचारी संघटनेच्यावतीने काळ्या फिती लावुन काम बंद आंदोलन करण्यात आले.
या आदोंलनात न.प. कर्मचारी संघटनेचे
अध्यक्ष दिपक कांबळे, उपाध्यक्ष मुनिर शेख, सचिव पठाण एफ.के, कोषाध्यक्ष कुंभार एल.बी, काकडे अजय, प्रकल्पाधिकारी सूरज गायकवाड , रोमन राजेंद्र , पटेल मुस्तक , खालील शेख, पुंड एच.एन. समीर मोकाशे , तानाजी गायकवाड, सतीश आखाडे , बचाटे ज्योतिर्लिंग , अण्णा जाधव , डुकरे सुशांत , येडगे शहाजी , चव्हाण प्रविण , सुशांत भालेराव , पवार नितीन , सपकाळ रानुबाई, जाधव मयुरी, खंडु नागणे , किशोर बनसोडे आदी कर्मचारी सहभागी झाले होते.